Sunday, June 26, 2011

माझ्या कविता..... काही जमलेल्या काही फसलेल्या....


1)आयुष्य.......

किती बरं झालं असतं जर आयुष्य
उलटं जगता आलं असतं ......

पहिलाच मरून घेतलं म्हणजे
मग आनंदात जगलो असतो..........
pension घेऊन वृद्धाश्रमात
आनंदाने राहिलो असतो........

मग कुटुंबासोबत माझ्या.....
एकत्र राहिलो असतो..........
क्षण सुखाचे सगळे........
सामवून रमलो असतो.........

मग ४० वर्ष काम करून......
जबाबदार्या पेलल्या असत्या.......
आणि लहान होतं होतं
मग retirement घेतलं असतं......

तरुण होऊन मग पुन्हा.......
मजा मस्ती केली असती.......
स्वतःच्या पैशाने मग......
मित्रांसोबत पार्ट्य केली असती...........

सगळा करून मग
शाळेत जायला लागलो असतो......
चिंता विसरून सगळ्या
उनाड पणात रमलो असतो.......

मग अगदी छोटा होऊन मी
पाळण्या मध्ये झोपलो असतो....
आईची माया बाबंचा प्रेम......
लाडात सगळ्यांच्या राहिलो असतो.......

शेवटचे मग ९ महिने.....
आईच्या पोटात काढले असते......
जगाच्या उत्पत्तीचे मूळ
कदाचित उमगले असते..........

किती बरं झालं असतं जर आयुष्य
उलटं जगता आलं असतं ......

2)
स्वप्न वेडी आणि दिवाना...........
स्वप्नवेडीच्या प्रेमात
होता एक दिवाना
तिला प्रेमाची कबुली
द्यायला मात्र लाजणारा.........

स्वप्न वेडीच्या मनात
प्रेम होते त्याच्यासाठी....
त्याच्या एका नजरेत.......
घायाळ होई स्वप्न वेडी............

तो होता मित्रात कायम
तरी नजर त्याची तिच्यावर........
ती मात्र लपून छपून.....
ठेवी नजर त्याच्या वर...........

रात्रीच्या एकांतात.....
ती रमे त्याच्या स्वप्नात........
तो मात्र तिच्या विचारात.....
जागवी पूर्ण रात्र.....

ती शोधात होती
प्रेम त्याच्या मनात....
पण पाहिलं नाही कधी
तिने त्याच्या नजरेत.......

तो होता झुरत......
तिच्या प्रेमाच्या नजरेला......
त्याला मात्र माहित नव्हतं
भुकेली ती त्याच्या प्रेमाला...........

शेवटी एकदा मात्र .........धीर केला दिवाण्याने.........आणि..........

बोलावले त्याने तिला......
भेटायला बागेमध्ये.........
rose होते त्याच्या हातात.....
नजरे मध्ये प्रेम सारे...........

ती पण आली नटून अगदी............साज शृंगार शोभत होता......तिला बघून दिवाना अजूनच घायाळ झाला.........

cute पण mute ती.....
लाजतच जवळ आली.......
पहिल्यांदाच त्याच्या नजरेस
नजर तिची हि मिळाली........

शब्द संपले........ ओठ रुसले........नजरेतल्या प्रेमानेच सारे काम करून टाकले...........hehe आणि मग...........

गुढग्यावर बसून त्याने.....
rose तिच्या हातात दिला......
तिने पण आणलेला ग्रीटिंग card .....
अलगद त्याच्या हाती दिला......

प्रेम होते दोघात
पण सांगायचा धीर नव्हता .....
आता मात्र जमल्या वर.......
शब्दांचा पूर वाहत होता........

अशी होती हि story
स्वप्न वेडी आणि दिवाण्याची........
मैत्रीच्या बंधात अडकलेल्या........
दोन प्रेमवेड्या जीवांची...........



3)
होता एक स्वप्नवेडीचा दिवाना.....

होती एक स्वप्न वेडी !!
तिच्या प्रेमाचा तो होता वेडा....
ओठातल्या तिच्या हसू वर....
जीव ओवाळून टाकणारा...........होता एक स्वप्नवेडीचा दिवाना........

गालातले तिचा हसणं
डोळ्यात सामावून घेणारा.......
सुख दुखात तिच्या.......
कायम साथ देणारा ........होता एक स्वप्नवेडीचा दिवाना........

ती खेळताना लाटेबरोबर....
भरतीची काळजी घेणारा......
सोबत तिच्या चालताना
पावले तिची मोजणारा ........होता एक स्वप्नवेडीचा दिवाना........

स्वप्न तिची पाहिलेली.....
सत्यात आणायला धडपडणारा.....
तिच्या तुटलेल्या स्वप्नांमध्ये.......
अश्रू तिचे वेचणारा...............होता एक स्वप्नवेडीचा दिवाना........

ती भांडत असताना.....
स्वताहून हर मानणारा.....
विस्कटलेल्या आयुष्याची घडी बसवताना......
पावलो पावली साथ देणारा................होता एक स्वप्नवेडीचा दिवाना........

पसरू नये तिचे तुटलेले मोती......
म्हणून सर्वस्व देणारा.......
शब्दवेड्याच्या कविता वाचताना.....
शब्द नवीन गुंफणारा...............होता एक स्वप्नवेडीचा दिवाना........

लग्न करून गेली जेव्हा......
स्वप्न वेडी परगावी........
तिच्या आठवणींमध्ये.....
रमून आयुष्य जगणारा ........होता एक स्वप्नवेडीचा दिवाना.....



4)
खरं ची व्यथा......
काय सांगू तुम्हाला
या 'खरं' ची व्यथा......
खोटा बोलणार्यांच्या तोंडी
कायम याचा वसा..........

खर बोलतो मी हा
'खरं' आहे दुखी......
म्हणतो होईल का
बरोबर वापर माझा कधी???

ज्ञानोबाची मराठी....
संतांची वाणी........
'खरं' शब्दाला किंमत
त्यात खूप भारी.....

गांधीजी म्हंटले या
'खरं' ची वाट धरा...
'खरं' म्हणतो बापू.......
मी तुमच्याच सोबत बरा......

वाक्यावाक्याला तुम्ही
'खरं' वापरता ..........
अरे आयुष्यात कधी......
बरोबर बोलता???????

खूप झाले आता......
मला सहन होत नाही........
'खरं' म्हणतो या पुढे ........
मी 'खरंच' बोलणार नाही........


5)
$$ काहूर $$

सूर तुझे छेडता,
मनात उठले एक काहूर............
भावनांना मग माझ्या;
नकळत आला पूर..............

मग झाले माझे डोळे
तुझ्या कवितेची साद
सोबत ओठ बनले
मृदुंगाचा नाद..........

गाणे नाही हे
तुझ्या आठवणींचे....
काव्य आहे हे
तुझ्या काल्पनिक सहवासाचे

पण नव्हतीस तू जेव्हा
मी तुला दिली साद
मन वाट बघत होते.....
पण नाही आला प्रतिसाद......

अजूनही मी थांबलो आहे
त्याच आयुष्याच्या वळणावर.......
ये ना परत एकदा
प्रेम कर माझ्यावर.....

सूर हाच मी राहीन आळवत
कारण आहेस तू खूप दूर
सूर तुझे छेडता,
मनात उठले एक काहूर............

6)
मी विरुद्ध मी....... 
किती मोठा वाद आहे हा......
मुखवट्या मागचा मी खरा कि 
जगाला दिसणारा मी खरा.....
आज हाच प्रश्न मला पडला आहे....
नक्की कोण आहे मी.....
त्या आठवणींना कुरवाळत होतो तो.....
कि त्या मागे सारून हसलेलो तो....
आज प्रश्नच पडला आहे मला.....
मी विरुद्ध मी........
द्वंद्व सुरु आहे माझ्या मनात कधीचे.....
तुझ्या जाण्याने बदललो खरा मी......
कि तू असताना आनंदी होतो तो मी.........
आज संपवेन म्हंटला हा वाद......
लढायाचाच ठरवला आज मी 
पण समोर मात्र पुन्हा मी.......
शेवटी राहिला तोच प्रश्न उभा......
कोणता आहे खरा मी.........
आणि सुरु राहिला वाद.......
मी विरुद्ध मी..........

7)
मी नाही विचारले पण माहित होते तिला.........
नझरेतून माझ्या समजले होते तिला..........

का बोलत नाही हा ते शब्द.......
प्रश्न पडला होता तिला.........
रोज msg करते मी........
तरी कसा काळात नाही याला........

इतका का घाबरतो हा.......
मी काय विचार करेन याला.......
मुलगी स्वतः बोलणार नाही
कळत कसा नाही मुर्खाला

४ शब्द तर बोलायचे आहेत......
"तू खूप आवडतेस मला"
का आवडते कळत नाही
भ्रमात जगायला याला................

वाट पहिली प्रत्येक वर्षाच्या........
त्या गुलाबी valentine's day ला......
delet करेन मी list मधून
असं वाटतंय का याला??????

अरे एकदा बोल ते शब्द
बघून डोळ्यात माझ्या......
क्षणात सांगेन हेच तुला
कि " आवडतो तू मला......." ♥ ♥ ♥


8)
अचानक.......

आज काहीतरी लिहावसं वाटलं.....
मनात आला विचार अचानक.....
पण विषय काही सापडेना......
आणि जुळलं पण नाही यमक.........

मुसळधार पावसावर लिहू......
कि रस्त्यावरच्या खड्यांवर..
याचा विचार करत बसलो मी तासभर.....
आज काहीतरी लिहावसं वाटलं अचानक.......

खिडकीत बसून बाहेर होतो बघत....
म्हंटला सुचेल काही सहज......
पण नुसता पोरी बघत बसलो दिवसभर.....
 तरी काहीतरी लिहावसं वाटलं अचानक........

आता मात्र हद्द झाली या मनाची......
रिकामपणाचा कहर केला याने......
लिहणार मी कविता भले लागो आयुष्यभर.......
काहीतरी लिहावसं वाटत आहे मला अचानक.........

9)
मुखवटा......

माणसे या जगात असतात..... 
किती तरी मुखवटा धारी.......
विसंगती असते त्यांच्या....
वागण्यात घरी अन दारी.......

कोणी घेतो मुखवटा...
चांगुलपणाचा 
प्रत्यक्षात मात्र 
साधत असतो मग स्वार्थाचा

कोणी ओढतो आनंदाचा मुखवटा....
दुख दिलेले लोकांनी 
पचवून सगळे मनात.......
सुगंध पसरवतो सुखाचा......

कोणी रंगवून चेहरयला...
ओढतो नटरंग बनून  मुखवटा....
सादर करून आपल्या कलेला...
रंगवतो प्रेक्षकांना .......

मी पण ओढला आहे एक मुखवटा....
पण कळेना का ते मलाच......
शोध घेतोय मी त्या मुखवट्यापाठी 
हरवलेल्या माझा........



No comments:

Post a Comment